पंख
युगानुयुगे मनूच्या टाचे खाली दबून
काळाच्या पडद्याआड गेलंय तुझं असणं
तुझ अस्तित्वच संपलय
तुझी जात बाई ची
तू घरातली अब्रू
जातीची इज्जत
समाजाची लाज
सगळं काही तूच
सार तुझ्या माथी मारलं
होय कळतंय तुला...
तूच आहेस करती धरती
सगळं काही टिकवून ठेवण्याची धडपड
तुझ्या विचारांवर
तुझ्या वागणुकीवर
तुझ्या कृतीवर
तुझ्या बोलण्यावर
सार ढकलतात तुला गुलामीच्या जोखडात...
पण एक ...
तू मुक्त आहेस
तूला जगायचंय स्वतःसाठी स्वतःच बनून पण
तुला घ्यायचाय मोकळा श्वास पण
तुलाही मोकळेपणाने बोलायचय पण
तुलाही स्वतंत्र निर्णय घ्यायचाय पण
असे अनेक 'पण' लागत राहतील तुझ्या ह्या अस्वतंत्र आयुष्यात
दुसऱ्यांसाठी जगताना
'पण' ह्या 'पण' ला तू पंख बनव
घे भरारी बंधनातून स्वतंत्रतेकडे
घे भरारी गुलामीतून मुक्तीकडे
घे भरारी तिमिरातून तेजाकडे
अन जग एका मोकळ्या आकाशासारख
ज्याला कोणीच सामावून घेऊ शकत नाही.......
नामदेव येडगे
24/10/18
युगानुयुगे मनूच्या टाचे खाली दबून
काळाच्या पडद्याआड गेलंय तुझं असणं
तुझ अस्तित्वच संपलय
तुझी जात बाई ची
तू घरातली अब्रू
जातीची इज्जत
समाजाची लाज
सगळं काही तूच
सार तुझ्या माथी मारलं
होय कळतंय तुला...
तूच आहेस करती धरती
सगळं काही टिकवून ठेवण्याची धडपड
तुझ्या विचारांवर
तुझ्या वागणुकीवर
तुझ्या कृतीवर
तुझ्या बोलण्यावर
सार ढकलतात तुला गुलामीच्या जोखडात...
पण एक ...
तू मुक्त आहेस
तूला जगायचंय स्वतःसाठी स्वतःच बनून पण
तुला घ्यायचाय मोकळा श्वास पण
तुलाही मोकळेपणाने बोलायचय पण
तुलाही स्वतंत्र निर्णय घ्यायचाय पण
असे अनेक 'पण' लागत राहतील तुझ्या ह्या अस्वतंत्र आयुष्यात
दुसऱ्यांसाठी जगताना
'पण' ह्या 'पण' ला तू पंख बनव
घे भरारी बंधनातून स्वतंत्रतेकडे
घे भरारी गुलामीतून मुक्तीकडे
घे भरारी तिमिरातून तेजाकडे
अन जग एका मोकळ्या आकाशासारख
ज्याला कोणीच सामावून घेऊ शकत नाही.......
नामदेव येडगे
24/10/18